Ad will apear here
Next
डॉ. स्नेहल माने-जगताप यांचा सत्कार
डॉ. स्नेहल माने-जगताप यांचा सत्कार.सातारा : येथील डॉ. स्नेहल माने-जगताप यांनी स्त्री रोग व प्रसूतिपूर्व उपचार पद्धती (गायनाकॉलॉजी) या विषयामध्ये (एमएस) ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्याबद्दल गौरीशंकर संस्थेच्या वतीने संस्थेचे प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांच्या हस्ते डॉ. स्नेहल माने जगताप यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. जगताप यांनी वैद्यकीय क्षेत्रात विशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधून त्यांनी ‘एमबीबीएस’ची पदवी प्राप्त करून संपूर्ण राज्यात सातवा क्रमांक व महाविद्यालयीन स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच स्त्री-रोग व प्रसूतिपूर्व उपचार पद्धतीतील विविध शोधनिबंधांची वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दखल घेऊन जगताप यांना गौरविले आहे. वैद्यकीय क्षेत्रासोबतच त्यांनी क्रीडा क्षेत्रातही भरीव कामगिरी केली आहे. बास्केटबॉल व कराटे क्रीडा प्रकारात त्यांनी राज्यस्तरीय संघात स्थान प्राप्त केले होते. वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत शिक्षणाचा लाभ सातारकरांना देण्याचा त्यांचा मानस असून, भविष्यात ‘टेस्ट ट्यूब बेबी’वर संशोधनात्मक कार्य करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

या वेळी गौरीशंकर संस्थेचे चेअरमन मदन जगताप, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, चेअरमन मिलिंद जगताप, संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप, डॉ. संजय कारंडे, डॉ. प्रताप गोळे, डॉ. सुरेश चव्हाण, डॉ. सुनील शेलार, डॉ. चैतन्य ठोके, डॉ. अभिषेक महाजन, डॉ. आदित्य महाजन, डॉ. विक्रांत महाजनी, डॉ. प्रमोद कुचेकर, डॉ. चैतन्य बोकील उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये डॉ. स्नेहल माने-जगताप यांच्या उज्ज्वल यशाबद्दल सर्वांनी अभिनंदन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZFZBE
Similar Posts
कृष्णा कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण रेठरे बुद्रुक (सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कराडचे उपविभागीय अधिकारी हिंमतराव खराडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या चार कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत आयोजित या कार्यक्रमाला कराड तालुका कृषी अधिकारी दत्तत्रय खरात, वाळवा तालुका उपविभागीय
‘जयवंतराव भोसले म्हणजे एक कुशल नेतृत्व’ शिवनगर (ता. कराड, जि. सातारा) : ‘दूरदृष्टी असणाऱ्या जयवंतराव भोसले यांनी स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिले. त्यामुळेच माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलीला डॉक्टर होता आले,’ असे उद्गार कविभूषण डॉ. जयश्री श्रेणिक पाटील यांनी काढले. सहकारमहर्षी जयवंतराव भोसले उर्फ अप्पासाहेब यांच्या चतुर्थ
प्रकाश पिसाळ विश्वनायक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित कराड (सातारा) : भारत सरकार संलग्न क्रांती ग्रामविकास संस्थेमार्फत दिला जाणारा विश्वनायक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार दैनिक ऐक्यचे सिनीअर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह व साप्ताहिक स्वप्ननगरीचे कार्यकारी संपादक प्रकाश पिसाळ यांना राष्ट्रीय स्तरावर समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबददल देण्यात आला
जे. के. अॅकॅडमीची प्रवेश प्रक्रिया सुरू सातारा : नुकतेच निकाल लागले आहेत. दहावीनंतर नक्की काय करायचे, हा यक्षप्रश्न सोडवून विज्ञान शाखा असे उत्तर आले असेल, तर विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच तयारी करायला हवी. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी ‘जे. के. अॅकॅडमी’ची येत्या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अॅकॅडमीमध्ये

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language